HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर

चीनमध्ये HMPV व्हायरसने(virus) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. चीनमधील HMPV या व्हायरसच्या उद्रेकानंतर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आहे. कारण आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी केल्या आहेत.

HMPV व्हायरसच्या(virus) उद्रेकानंतर आरोग्य विभागाने घाबरण्याची गरज नाही, तसेच नागरिकांमध्ये भिती पसरवू नका, असा सल्ला देखील दिला आहे. याशिवाय योग्य ती मार्गदर्शक तत्त्व व दक्षता बाळगण्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अशा रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत अशा सूचना देखील आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.

HMPV या आजाराची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच आहेत. सामान्य प्रकरणांमध्ये खोकला किंवा घरघर वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं हे आहेत. याशिवाय लहान मुलं आणि वृद्धांना HMPV संसर्गाचा धोका अधिक आहे. कारण या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये लक्षणं दिसू शकतात.

– खोकताना किंवा शिंकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल ठेवावा.
– सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत.
– ताप, खोकला व शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
– भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि पौष्टिक खा.
– संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल याची मात्र दक्षता घ्या.

हेही वाचा :

बुमराहच्या शूजमधून पडलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?

मनोज जरांगे कोणाच्या फोननंतर पुण्यातील मोर्चा सोडून माघारी, समोर आलं कारण

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट