नागपूर : हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यशानंतर आता रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लीपर’(sleepers) ट्रेनही येणार असून, सर्वप्रथम ही ट्रेन राजधानी दिल्लीत चालवण्यात येणार आहे. दिल्लीला जोडणाऱ्या शहरांमधून ही ट्रेन धावणार आहे. तर महाराष्ट्रासाठीही दोन ट्रेन मिळणार आहेत. सर्वप्रथम नागपूर विभागीय मंडळावर ही ट्रेन चालवण्याची शक्यता आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-318-853x1024.png)
देशात ‘वंदे भारत ट्रेन’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, सुमारे 100 हून अधिक वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता लवकरच वंदे भारत स्लीपरही(sleepers) धावणार आहे. त्याची चाचणीही झाली आहे. महाराष्ट्रात ही ट्रेन नागपूर-पुणे, नागपूर- मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठवला आहे.
नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अकोला, शेगाव, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण ठाणे, दादर, मुंबई याठिकाणी स्लीपर वंदे भारत थांबण्याची शक्यता आहे. नागपूर- सिंकदराबाद, नागपूर-इंदूर, नागपूर-बिलासपूर या तीन मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.
मोदी सरकारने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर ट्रेन येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी बोगी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी प्रस्ताव मांडला आहेह. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई यादरम्यान या दोन ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.
सध्या पुण्यापासून मुंबई, नागपूर आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांना वंदे भारत एक्स्प्रेस सेवा चालवली जात आहे. नवीन ट्रेन्स सोडल्यामुळे पुणेकरांना विविध शहरांमध्ये सोयीने आणि जलद प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाने पुणेकरांच्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे.
हेही वाचा :
नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा; असे झाले तर, थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम
सोनू सूदच्या ॲक्शन लूकने चाहते झाले चकित, साऊथ सिनेमांनाही ‘फतेह’ने दिली टक्कर!
लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी गूड न्यूज; शस्त्रक्रियेविना होणार उपचार