शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; शिक्षण सेवकांच्या मानधनात केली घसघशीत वाढ

राज्यातील प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण (secondary education) सेवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच राज्य मंत्रीमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना आता १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना २० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षण सेवकांच्या  मानधनात वाढ व्हावी, यासाठी (secondary education) शिक्षक संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. विधिमंडळात हा मुद्दा लोकप्रतिनिधींनी सुद्धा उचलून धरला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देखील शिक्षण सेवकांना दिल्या जाणाऱ्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

अखेर शिंदे-फडणवीस सरकारने  शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता प्राथमिक शिक्षकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना २० हजार रुपये मानधन करण्यात येणार आहे.

शिक्षण सेवकांना किती मानधन मिळतं?

२००० पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली ३ वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते.

यापूर्वी २०११ साली शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून प्राथमिक शिक्षकांना ६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना ८ हजार रुपये व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जात होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा :