‘आम्ही चिरफाड केली तर माफीवीरापासून सर्व बाहेर निघेल’; काँग्रेसचा थेट इशारा

‘लहान मुलांना सावरकर कळले पण त्या दिल्लीतल्या 50 वर्षीय घोड्याला सावरकर कळले नाही’, असा टोला (actors) अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील काँग्रेस आक्रमक झाली होताना दिसते आहे. स्वातंत्रवीर सावकार यांच्या जीवन कथेवर आधारित पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावर आता देशभरात काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. पुण्यात देखील पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने पोंक्षे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

व्यावसायिक नाटककाराने आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन केले. जो आपल्या मुलीला शिक्षणासाठी परदेशात पाठवतो आणि इथल्या बहुजन पोरांना सावरकरांची दहशत दाखवायला सांगतो, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो’, असं वक्तव्य काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले आहेत.

शरद पोंक्षे (actors) यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल वापरलेले शब्द मागे घेतले नाही तर त्यांना पुण्यात कार्यक्रम करताना काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पुणे काँग्रेसकडून देण्यात आला आहे. शिंदे यांनी पुढे असे म्हटले की, ‘व्यावसायिक नाटकाराने आपली सीमा ओळखावी आणि नाही त्या भानगडीत पडू नये. येणाऱ्या काळात आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर देऊ. आता आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आम्ही जर बोलायला लागतो तर सगळी चिरफाड करू. मग माफीविरापासून आजपर्यंत सगळं बाहेर निघेल’. अशा शब्दात थेट इशाराच त्यांनी शरद पोंक्षेंना दिला आहे.

याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी देखील पोक्षेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. खरात यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालण्याचीदेखील मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते पोंक्षे?

लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या घोड्याला सावरकर कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ‘या एवढ्या कार्यक्रमापुरते नका थांबू, सावरकर हे फार मोठे माणूस होऊन गेले. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्ताचा जेवढा अपमान केला जातो तो आतापर्यंत कोणाचाच झाला नसेल. आता सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकरप्रेमी आला म्हटलं की, दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसलाही आहे. ती दहशत वाढली पाहिजे’, असं विधान शरद पोंक्षे यांनी केलं आहे.

हेही वाचा :


राज्यपाल, राज्यसभा सदस्य बनवण्याची बतावणी करत १०० कोटी लाटले

Leave a Reply

Your email address will not be published.