महिन्याभरानंतर केतकी चितळेची तुरूंगातून सुटका!

अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. केतकी चितळेनं शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चांगलीच अडचणीत सापडली.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी (Ketki Chitale) विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. केतकीच्या कोठडीत अनेकदा वाढ झाल्यानंतर बुधवारी अखेर तिचा जामीन मंजूर झाला.
20 हजार रूपयांच्या जातमुचकल्यावर केतकीचा जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 40 दिवसांनंतर केतकीची तुरूंगातून सुटका झाली आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य कायम ठेवत केतकी तुरूंगातून बाहेर आली.
दरम्यान, केतकीने तुरूंगातून बाहेर येताच जय हिंद, जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिली आहे. केतकीने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वच स्तरांवरून केतकीवर टीका करण्यात आली होती.
हेही वाचा :