वेदांतानंतर ‘PhonePe’ची बारी, गब्बर होतायेत शेजारी; रोहित पवारांच्या ट्विटनं खळबळ

वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxcon) हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आता ‘फोन पे’ हा युपीआय कंपनीनं देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेत कर्नाटकात बस्तान बांधलं आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे
वेदांतानंतर (Vedanta-Foxcon) PhonePeची बारी… गब्बर होतायेत शेजारी…महाराष्ट्र पडतोय आजारी…व्वा रे सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक PAY पण महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा WAY! अशा नेमक्या शब्दांत रोहित पवार यांनी ट्विट करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Smart News:-