अरेरे…! 33 लाखांची नोकरी मिळूनही भारतीय तरुणाची ही संधी हुकलीच

आता बातमी आहे एका भारतीय मुलाची. वेदांत राजू देवकाने भारताची मान उंचावली आहे. वेदांतला अमेरिकेतील एका नामवंत कंपनीकडून (reputed company) तब्बल 33 लाखांच्या नोकरीची ऑफर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात वेदांतने युट्यूबवरुन सॉफ्टवअर कोडिंगचं शिक्षण घेतलं आणि एका स्पर्धेत भाग घेतला.

वेदांतने 2,066 ओळींचं कोडिंग तयार केलं. 15 वर्षीय वेदांतने एक हजार सॉफ्टवेअर डेव्हलपरला हरवलं आहे. त्याची ही किमया पाहून अमेरिकेतील कंपनीने (reputed company) त्याला नोकरीची ऑफर दिली.

नागपूरकरांना वेदांतचा अभिमान
वेदांत हा नागपुरातील रमणा मारुती परिसरातील रहिवासी आहे. सध्या तो दहावीचा अभ्यास करतो आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊन होतं. त्यात शिक्षणसुद्धा ऑनलाईन सुरु होतं. मग अशावेळी काय करावं असा वेदांतला प्रश्न सतवत होता. त्याने या वेळेचा सोन्यासारखा वापर केला. त्याने युट्यूबवर सॉफ्टवेअरसंबंधित अभ्यास केला. तो अभ्यास करुन थांबला नाही तर त्याने एका स्पर्धेत पण भाग घेतला. ज्यात त्याने एक हजार सॉफ्टवेअर डेव्हलपरवर मात केली आणि ही स्पर्धा जिंकली

33 लाखांची नोकरी पण…
वेदांतचं वय कमी असल्याने त्याचासमोरील ही संधी हुकली आहे. पण अमेरिकेच्या कंपनीने तिला आश्वासन दिलं आहे की, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नव्याने ऑफर देण्यात येईल. विशेष म्हणजे वेदांतच्या या गुणाबद्दल त्याचा कुटुंबियांनाही माहिती नव्हतं. पण आता कुटुंबियासोबत भारतीयांना वेदांतचा अभिमान आहे.

Smart News :


हिंदू वेशात मुस्लीम तरुणांकडून 3 दर्ग्यांमध्ये तोडफोड; वातावरण बिघडवण्यासाठी रचला मोठा कट

Leave a Reply

Your email address will not be published.