अमृता फडणवीस यांची व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बदनामी;

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत राजापूर तालुक्यातील एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर (whatsapp group) बदनामीकारक मजकुर असणारी पोस्ट व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) संयोजक अनिलकुमार करंगुटकर यांनी राजापूर तालुका पोलीस निरीक्षकांकडे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अमृता फडणवीस यांचा मुलाखत देतानाचा एक फोटो व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर (whatsapp group) व्हायरल करण्यात आला असून त्या फोटोखाली बदनामीकारक मजकुराचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर घडली आहे. संबंधिताविरोधात विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दि.०९ जुलै २०२२ रोजी रात्री १०.१८ वाजता संशयित अशफाक मापारी नामक व्यक्तीने या ९४२२४३३७९६ या भ्रमणध्वनीवरून पाठविला आहे, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पोलीस निरीक्षक, राजापूर यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याबाबतचे पुरावेही त्यांनी या पत्रासोबत जोडले आहेत.त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यावर राजापूर पोलीस कोणती कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे: अमृता फडणवीस

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय नाट्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला होता. “देवेंद्र रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. यादरम्यान वेगळाच पोशाख करुन, डोळ्यावर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे. मलाही ओळखू यायचे नाहीत”, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.

सत्तासंघर्षाच्या काळात सगळे आमदार झोपल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायचो, असं विधानसभेत केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी कशाप्रकारे व्हायच्या, याचे गुपित उघड झाले होते.

हेही वाचा :


शिवसेनेचे 12 खासदार देणार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *