रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन

रसना ग्रुपचे संस्थापक (founder) आणि अध्यक्ष आरीस पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले आहे. रसना ग्रुपने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. खंबाटा यांचे वय ८५ होते त्यांचे शनिवारी निधन झाले. ते अरिज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. याशिवाय, ते WAPIZ चे माजी अध्यक्ष आणि अगमहाबाद पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष देखील होते. खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असं निवेदनात म्हटले आहे.

खंबाटा हा लोकप्रिय घरगुती पेय पदार्थ रसना म्हणून ओळखला जातो. देशातील १८ लाख रिटेल आउटलेटवर त्याची विक्री होते. रसना ही आता जगातील सर्वात मोठी कोरडी/ केंद्रित शीतपेय उत्पादक कंपनी आहे. (founder) खंबाटा यांनी १९७०मध्ये महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून रसना या प्रोडक्टची सुरुवात केली. स्वस्तात मस्त शीतपेय म्हणून रसना अल्पावधीतच देशभरात लोकप्रिय झाला.

कधीकाळी अवघ्या पाच रुपयांच्या पॅकेटमध्ये रसनाचे ३२ ग्लास भरत असे. सध्या रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील ६० देशांमध्ये विकले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेय बाजापेठेतील मक्तेदारीला रसनाचे आव्हान दिले. ‘मेड इन इंडिया’ उत्पादन असलेल्या रसना या शीतपेयाला सामाजातील सर्वच स्तरातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. अनेकांच्या बालपणीच्या आठवणीदेखील रसनाशी जोडल्या गेल्यात.

हेही वाचा: