विधीमंडळ परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

नागपुरात विधानभवनाच्या (legislature)  मुख्य दारासमोर एका 28 वर्षी तरुणीने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव कविता चव्हाण असून ती सोलापूरची आहे.

महापुरुषांचा अपमान होतो,  वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा करत तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सध्या तिला पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे.

नागपूरच्या विधीमंडळ परिसरात (legislature) टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदा करावा, यासाठी महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी दुपारी २:३५ वाजण्याचा सुमारास कविता चव्हाण यांनी रॉकेल ओतले आहे. यावेळी कविता चव्हाण यांनी ‘शिवाजी महाराज की जय’ या आशयाच्या घोषणा देखील दिल्या.

हेही वाचा :