मोठी बातमी! सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. (hearing) शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत.

सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. आता 14 फेब्रुवारीला सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची? (hearing) यावर सत्तासंघर्ष दिसून येत आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी यासंदर्भात पुढील सुनावणी आता व्हॅलेंटाईन डे ला म्हणजे १४ फेब्रवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :