चोरट्या दारू वाहतुकीवर बोरगाव पोलिसांची दमदार कारवाई!

तवेरा (tavera) गाडीतून महामार्गावरून अवैधरित्या चोरटी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर बोरगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत १०७६ देशी दारूच्या बाटल्या असलेल्या १७ बॉक्ससह सुमारे २.९९ लाख मुद्देमाल जप्त केला.

बुधवारी पहाटे आशियाई महामार्गावरील अतीत (ता.सातारा) गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी ही दमदार कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आमिर गुलाब मुलाणी (वय.३०,रा.देशमुखनगर,ता.सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

बुधवारी पहाटे कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या आशियाई महामार्गावरून लाल रंगाच्या (tavera) तवेरा गाडीतून आमिर गुलाब मुलाणी हा अवैधरित्या देशी दारूचे बॉक्स विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली. यावेळी हवालदार प्रवीण शिंदे, राहुल भोये, विशाल जाधव व एस.एन.जाधव यांनी महामार्गावरील अतीत येथील भुयारी पुलाजवळ सापळा रचला.

पहाटे ५.५४ च्या सुमारास सेवारस्त्याने येणारी लाल रंगाची तवेरा गाडी पोलिसांनी अडवली. तिची तपासणी केली असता गाडीत देशी दारूचे १७ बॉक्स आढळले. पोलिसांनी तवेरा गाडीसह देशी दारूचे बॉक्स जप्त करून आमिर मुलाणी याला ताब्यात घेतले.

हेही वाचा :


गरिबांना धक्का! केंद्र सरकारच्या दोन महत्वाच्या विमा योजनांचा प्रिमीयम वाढला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *