कंटेनरने कारला अक्षरश: फरफटत नेलं

पुणे अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूरजवळ कंटेनर आणि कारचा (refrigerator containers) भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की लोक डोळे विस्फारुन बघत राहीले. कंटेनरने कारला अक्षरश: फरफटत नेले आहे.

या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या कारला कंटेनरने (refrigerator containers) फरफटत नेले त्या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही हानी झाली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात मृत्यू उभा असल्याचा अनुभव त्यांना आला आहे.

पुणे ते अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या शिक्रापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. व्हिडिओ पाहुन अंगावर काटे येतील अशी ही घटना आहे. दैव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे चारही प्रवासी सुखरूप राहीले.

या घटनेनंतर प्रवासी अजूनही तणावाखाली असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.

Smart News :