ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (farmer news) अत्यंत महत्त्वाची बातमी. कुठल्याही कारखान्याला ऊस देण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे आता यापुढे दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे.

साखर कारखान्यांचा कारभार समाधानकारक नसतानाही संबंधित कारखान्यांना ऊस देण्याचं बंधन आता उठण्याच्या मार्गावर आहे.  केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला हे बंधन उठविण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाका, असं स्पष्ट केले आहे. ऊस उत्पादकांना(farmer news)चांगला दर मिळावा यासाठी कृषी मूल्य आयोगाच्या पातळीवर या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :


सांगलीत गुंडाचा निर्घृण खून

Leave a Reply

Your email address will not be published.