किल्ल्यावर पाय घसरुन 64 वर्षीय वृद्ध दरीत कोसळला!

साताऱ्यातून  थराराक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध व्यक्त दरीत (valley) कोसळला आणि 12 तासांपेक्षा जास्त काळ हा व्यक्ती दरीतच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या वृद्ध व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आल. हनुमंत जाधव  असं दरीत पडलेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.

ते 64 वर्षांचे असून ते शुक्रवारी संध्याकाळी दरीत (valley) पडले होते. ही थरारक घटना अजिंक्यतारा किल्ल्यावर  घडली होती. साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर 64 वर्षीय व्यक्ती दरीत कोसळला असल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हनुमंत जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी म्हणून अजिंक्यतारा किल्ल्यावर गेले होते. हनुमंत जाधव यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळले. संपूर्ण रात्र आणि 12 तासाहून अधिक काळ ते दरीत अडकून पडले होते.

सकाळपासून बचावकार्य
ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने संबंधित व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. यानंतर हनुमंत यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य केलं गेलं.

अखेर जीवदान
स्थानिक पोलीस आणि बचाब पथकाच्या मदतीने रोप टाकून दरीत अडकलेल्या हनुमंत जाधव यांना जीवदान देण्यात आलं. यावेळी दोघे जण आधी रोपने दरीतून पलिकडच्या बाजूला गेले. त्यानंतर एका जाळीद्वारे 64 वर्षीय वृद्ध व्यक्तीला हेल्मेट आणि बेल्ट बांधले. त्यानंतर या व्यक्तीला दुसऱ्या बाजूला पाठवण्यात आलं.रिव्हर क्रॉसिंग प्रमाणेत वृद्ध हनुमंत जाधव यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यानं अखेर सुटकेचा निश्वास सोडण्यात आला. हा संपूर्ण थरार शनिवारी सकाळी घडला. दरीत अडकलेल्या या व्यक्तीने प्राण वाचवणाऱ्या सर्वांचेच आभारही मानलेत. दरम्यान, रात्रीच्या अंधारात आणि 12 तासांपेक्षाही जास्त वेळ ही व्यक्त दरीत अडकलेली असताना, नेमकं किती बाका प्रसंग घडलेला असेल, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारीय.

Smart News :


विजेचे बील होईल अर्ध्याहून कमी ; या 3 गोष्टीं वापर आजच बंद !


कोल्हापूरमध्ये काल तरूण तर आज तरूणीची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published.