1 एप्रिलपासून सरकारी कार्यालये होणार पेपरलेस

येत्या 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व सरकारी कार्यालये पेपरलेस (paperless) म्हणजेच कागदविरहीत होणार आहेत. सर्व कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही शासकीय कामकाजाच्या फाइल्स निर्णयासाठी चार स्तरांपर्यंतच पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

फाइल्सचा प्रवास कमी होणार

सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाइल आठ विविध स्तरांमधून येते. त्यामुळे फाइल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो. फाइल्सचा हा (paperless) प्रवास कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त चार स्तरांवरूनच फाइल मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा :