हृदयद्रावक! बाहुलीला फाशी दिल्यानंतर चीमुकल्याची आत्महत्या!

पिंपरी चिंचवडमध्ये बाहुलीला (doll) फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय मुलाने स्वतः ही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.खेळता खेळता मुलाने आधी बाहुलीच्या तोंडावर कापड टाकले अणि त्या बहुलीला फाशी दिली आणि बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला.मुलाने स्वतःही तोंडावर तसाच कापड टाकले आणि मग गळफास घेतला. दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना थेरगावमध्ये घडली आहे. ज्या सोसायटीच्या पायऱ्यांखाली ते राहतात त्याच सोसायटीच्या गेटवर वडील सुरक्षा देत होते. आई तिथंच बाहेर होती. त्यावेळी घरात ही घटना घडली.

मुलगा बाहुली (doll) सोबत खेळत असल्याने आई कामात व्यस्त राहिली बराच वेळ मुलाचा आवाज आला नाही ,म्हणून आईने आत मध्ये डोकावून पाहिले. तेव्हा आईला मुलगा खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने त्याच्या आधी बाहुलीला देखील तोंडावर कपडा टाकून फाशी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला आहे.हि घटना पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे घडली आहे.

मोबाईलमधील व्हिडीओ पाहून मुलाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना दिला आहे. ही घटना घडली त्या वेळी मुलाची आई घरातच होती. दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता.बाहुलीला फास या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्व परिसर खळबळून निघाला आहे.

हेही वाचा :


कोल्हापुरात ९२ पैकी ४६ जागा महिलांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *