Anil Parab यांच्या अडचणीत वाढ?

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब  यांच्याशी संबंधित (ed) ईडीची चौकशी  अद्यापही सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात  26 मे रोजी ईडीची टीम दाखल झाली. वादग्रस्त साई रिसॉर्टच्या संदर्भात चौकशी सुरू झाली आणि ही चौकशी अद्यापही सुरूच आहे. ईडीची ही टीम अद्यापही रत्नागिरीतील विविध ठिकाणी चौकशी करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साई रिसॉर्ट प्रकरणात 26 मे रोजी (ed) ईडीच्या टीमने धाड टाकली होती. रत्नागिरीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी ईडीकडून अद्यापही चौकशी सुरु आहे. दापोलीनंतर आता खेड आणि रत्नागिरीमध्ये हि ईडीनं चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. 2017 मध्ये एक कोटी रुपये खर्च करून साई रिसॉर्टची परब यांच्याकडून जमिन खरेदी करण्यात आली. 2017 ते 2020 या काळात साई रिसॉर्टवर 25 कोटी रुपये खर्च केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.

मुरुड ग्रामपंचायतीतून ED च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे

वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 26 जून 2019 ला अनिल परब यांनी साई रिसॉर्ट कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागलीय. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड ग्रामपंचायतमध्ये अनिल दत्तात्रय परब यांच्या नावाने 46 हजार 800 रुपये कर भरल्याचा पुरावा हाती लागला आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही अशा स्वरुपाचे वक्तव्य वारंवार केलं होतं. मात्र आता चक्क ईडीच्या हाती मूळ कागदपत्रे लागल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांचा आरोप काय?

साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले.

भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टची बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला.

12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले.

30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परबने सदानंद कदमला 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले.

मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला.

डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचे घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.

हेही वाचा :


मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *