शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता…

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे समोर आले आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभू यांना मान्यता मिळाली असून ती मान्यता विधीमंडळाकडून देण्यात आली आहे. (maharashtra political news) मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे.

शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदावर दावा केला होता. मात्र झिरवळ यांनी शिंदेंचा दावा फेटाळला असून आता नियमानुसार अजय चौधरी यांची विधीमंडळात नोंद केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुढे कोणती पाऊले उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर पुढची भूमिका ठरवण्यासाठी शिंदेंना न्यायालयात दाद मागवी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.(maharashtra political news)

maharashtra political news

दरम्यान, शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी एक पत्र पाठवून पक्षाच्या सभेला उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी थेट भरत गोगावले यांची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली. त्यांनी एक ट्वीट करत याबबातची माहिती दिली होती.

 

हेही वाचा :


10 वी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, फक्त 20 रुपयांत असा करा अर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published.