शिंदेंचा प्लॅन यशस्वी, ४१ आमदार ६ अपक्षांचा पाठिंबा!

सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४० आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सेनेला मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झालंय. (maharashtra political news today)

उद्धव ठाकरे यांनी वर्षावरून मातोश्रीकडे प्रस्थान केलंय. आणि तुमचं म्हणणं असेल तर शिवसेना प्रमुखपदही सोडतो, असं म्हणाले. यानंतर आणखी ट्वीस्ट येणार हे स्पष्ट झालंय.

एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक सध्या शिंदेंसोबत आहेत. सूनील प्रभूला बघू, असं ते म्हणाले.(maharashtra political news today)

संख्याबळ शिंदेंकडे… खरी शिवसेना कोणाची?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला यश आलं आल्याचं दिसतंय. सेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचा प्लॅन यशस्वी झालाय. आता ठाकरे यांना सहकार्य करणारे फक्त १४ आमदार उरले आहेत.

याशिवाय तत्काळ सहा अपक्ष, यामध्ये नरेंद्र भोंडेकर, आशिष जैस्वाल आणि बच्चू कडू गटातले अन्य काही आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे चेहरे शिंदे गटात!

आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल गुवाहाटी पोहोचत असल्याची माहिती मिळतीय. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला ४० आमदारांचा आकडा आता पूर्ण होणार असल्याचं दिसतंय.

– शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल गोवाहटीसाठी निघाल्याची माहिती

– शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल नॅाटरिचेबल होते

– मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गौप्यस्फोट करुन उडवून दिली होती खळबळ

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार म्हणून जैसवाल यांची ओळख

मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसलाय. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यामुळं दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचं स्पष्ट झालंय.

दीपक केसरकर हॉटेलमधून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी त्यांची अडवणूक केली होती.

सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत, एकनाथ शिंदेंच्या गटात झाले सामील.

हेही वाचा :


Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *