मी सीडी काढली तर महाराष्ट्र हादरेल : करुणा शर्मा

धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली. इतकेच नाही तर मी जर एक (cd) सीडी काढली तर महाराष्ट्र हादरेल, असे वक्तव्य करुणा शर्मा यांनी केले. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेवर अनेक गंभीर आरोप लावले. धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणाला खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबून ठेवले, कारण रेणू शर्मा धनंजय मुंडेंबाबत पत्रकार परिषदेत मोठा खुलासा (cd) करणार होती. मात्र, त्या अगोदरच तिला पोलिसांनी अटक केल्याचा आरोप करुणा शर्माने केला आहे.

मी धनंजय मुडें यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही. राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे. मी आत्तापर्यंत पवार साहेबांचा मान ठेवत होते. मात्र, या प्रकरणात ते अशा व्यक्तींला पाठीशी घालत असल्याचे बघून वाईट वाटते, असेही करुणा शर्माने सांगितले.

आपली मुलगी शिवानी धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेणार होती. मात्र, तिला धमकवल्यामुळे ती पत्रकार परिषदेत गैरहजर राहिली. मुंडे यांच्या दबावामुळे आमच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यांच्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली, असा आरोपही करुणा शर्माने केला आहे. मी मुंडे यांची पहिली पत्नी आहे. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा करुणा शर्माने केला आहे.

हेही वाचा :


वस्त्रनगरीची ओळख पुन्हा ‘क्राईमनगरी’कडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *