पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजवून सोडणारा पोलीस कॉन्स्टेबल अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील शेतकऱ्याकडे एक कोटीच्या लाचेची मागणी करून पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजवून सोडणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील निलंबित (police constable) पोलीस कॉन्स्टेबल जॉन विलास तिवडे (वय 40 राहणार कोरोची तालुका हातकणंगले  याला कुपवाड पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी मिरज येथे अटक केली.

बडतर्फ (police constable) पोलीस कॉन्स्टेबल तिवडे याच्याविरुद्ध सप्टेंबर 2020 मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाडचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील आणि त्यांचे पथक जॉन तिवडे यांच्या मार्गावर होते, मात्र तो सतत चकवा देत फरारी होता.

आठवड्यापूर्वी त्याने कर्नाटक येथून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. कुपवाड पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे त्याचा बेळगाव, हुबळी परिसरात शोध घेतला होता मात्र तो हाताला लागला नव्हता.

आज सकाळी संशयित तिवडे मिरजेत आल्याची बातमी समजतात पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सापळा रचून त्यास अटक केली. मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येत आहे असे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले.

संशयित तिवडे याने देहूरोड येथील 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला पुणे येथील महसूल न्यायाधिकरणमध्ये दाखल खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीच्या लाचेची मागणी केली होती.

संबंधित शेतकऱ्याने याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तिवडे याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ उडाली होती. कुपवाड येथील दाखल गुन्ह्यात अटकेनंतर त्याचा ताबा घेण्यात येईल असे लाच लुचपत प्रतिबंध पथकाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :


कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

Leave a Reply

Your email address will not be published.