महासत्तांतरा नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. या महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच (Mumbai ) मुंबईत दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यासाठी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत (Mumbai ) दाखल होत असल्याने मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपची जोरदार तयारी सुरु केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर होणार महत्वपूर्ण बैठक होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्रभूमीवर मोदींचा दौऱ्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा :