वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एक जण ठार; पाच जखमी!

पुणे-बंगळूर (pune bangalore) महामार्गावरील लिंब फाटा परिसरातील गौरीशंकर नॉलेज सिटीजवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात झाला. टायर फुटलेला वारकऱ्यांचा ट्रक थांबला असता, आयशर गाडीने पाठीमागून धडच दिल्याने हा अपघात झाला. आयशर गाडीने धडक दिल्याने, या अपघातात एक वारकरी जागीच ठार झाला, तर पाच जण जखमी झाले. वारकऱ्याच्या मृत्यूने कडेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील ४८ वारकऱ्यांना घेऊन ट्रक ( MH 11 AL 5673 ) सोमवारी रात्री निघाला होता. (pune bangalore) पुणे बंगळूर महामार्गावरील सातारा तालुक्यातील गौरीशंकर नॉलेज सिटी जवळ मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोहोचला असता, ट्रकचा पुढील टायर फुटला. हा फुटलेला टायर चालक बदलत असताना पाठीमागून पुणे बाजूस जाणाऱ्या आयशर ( MH 46 BB 2241 ) ने या वारकऱ्याला जोरदाराची धडक दिली.

आयशरने दिलेल्या धडकेत ट्रकच्या पाठीमागे बसलेले वारकरी भीमराव कोंडीबा जगताप ( वय 65 ) हे जागीच ठार झाले. तर नंदू महाराज पवार ( दिंडीचालक), अशोक देवप्पा मोहिते ( वय 55 ), मारुती ज्ञानू माने, चालक संजय शिरतोडे ( सर्व राहणार कडेगाव तालुका ) हे जखमी झाले आहेत. तर याशिवाय इतर वारकऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ ट्रकमधील वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची माहिती सातारा पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिस पेट्रोलिंगची गाडी पोहचत, जखमींना सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इतर वारकऱ्यांना सातारा पोलीस ठाणे आणि महसूल विभागामार्फत अपघातग्रस्त वारकऱ्यासांठी चहा, नाष्टा आणि इतर सुविधा सोय करत वारकऱ्यांना परत दुसऱ्या ट्रकने पुढे रवाना केले.

दरम्यान, या अपघाताची माहिती कडेगाव तालुक्यात कळताच कडेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. तर या अपघातामध्ये कडेगाव तालुक्यातील एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने या भागात शोककळा पसरली. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. नि. विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. नि. चौधरी करत आहेत.

हेही वाचा :


Yoga Day 2022: वयाची चाळीशी ओलांडली पण याचं सौंदर्य अजुनही तेच!

Leave a Reply

Your email address will not be published.