शरद पवार विरुद्ध फडणवीस पुन्हा रंगणार सामना?

राजकीय आखाड्यातच नाही तर आता आणखी एका ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (match) विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगणार आहे. मुंबईमध्ये MCA च्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. २८ सप्टेंबरला MCA च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना रंगताना पाहायला मिळू शकतो.

1983 वर्ल्ड कपचे हिरो म्हणून ओळखले जाणारे (match) संदीप पाटील यांनी MCA ची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी कोच आणि चिफ सिलेक्टर म्हणून ओळख असलेल्या संदीप पाटील यांना MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे. २८ सप्टेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत आता ५ स्पर्धक असणार आहेत.

ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. MCA पासून माझी सुरुवात झाली. या संस्थेनं मला खूप काही दिलं आहे. आता त्याचे ऋण फेडण्याची ही योग्य वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. संदीप पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहे. त्यांचा पूर्ण पाठिंबा देखील संदीप पाटील यांना आहे असं टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. तर अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचाही टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

MCA च्या निवडणुकीदरम्यान पुन्हा अप्रत्यक्षपणे पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळू शकतो. गेल्या वर्षी संदीप पाटील इच्छुक होते. मात्र काही अटी आणि अडचणी असल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. यावेळी रिंगणार उतरणार आहेत.

यंदा MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत. संदीप पाटील, विजय पाटील,अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी मात्र खरी चुरस संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात असणार आहे. संदीप पाटील यांना शरद पवारांचा तर काळे यांना फडणवीसांचा सपोर्ट आहे. त्यामुळे आता या निवडणुकीवर सगळ्यांचा नजरा आहेत.

Smart News :