मुंबईच्या वाडिया रुग्णालयात मोठी आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या रवाना

Smart News:- मुंबईच्या वाडिया रुग्णालयात मोठी आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या रवाना

Smart News:- मुंबईतून एक खूप मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील नामांकित वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आगीची भीषण घटना घडली आहे. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आहे.

त्याच भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी का लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पण आगीच्या घटनेने परिसर प्रचंड हादरला आहे. अग्निशमन दलाकडून आगीबाबत माहिती देण्यात आली आहे. ही आग लेव्हल दोनची आग आहे. ही आग संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लागली.  मन दल युद्धपातळीवर घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या. दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Smart News:-

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाने नंबर वन राहण्याची परंपरा टिकवली – चंद्रकांत पाटीलशिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणार


देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचंय, म्हणूनच…; शशिकांत शिंदे यांचा खळबळजनक दावा


भयानक! धावत्या बस मध्ये तरुणीवर गँग रेप केला आणि.

Leave a Reply

Your email address will not be published.