आयुष्यभर शिवसेनेतच राहण्याचा दावा करणारे अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात सामील

एकनाथ शिंदे  यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच मराठवाड्यातही शिवसेनेला  मोठा धक्का बसला आहे. जालना शिवसेनेचे नेते तसेच माजी मंत्री अर्जुन खोतकर  (the political news) हे सुद्धा शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी याबाबतच कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अर्जुन खोतकर यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते आता शिंदे गटात सामील झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (the political news) काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट झाल्याची अधिकृत सूत्रांनी दिली होती.

याबाबतची माहिती साम टिव्हीने दाखवली होती. आमदाराच्या बंडानंतर मराठवाड्यात मोठी खिंडार पडण्याची शक्यता देखील साम टीव्हीने वर्तविली होती. त्यानंतर मात्र आज अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

गेल्या चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांची महाराष्ट्र सदनमध्ये झाल्याच वृत्त साम टीव्हीने दाखवलं होतं. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आज प्रत्यक्षात खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, मराठवाड्यातून आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या गटात 9 आमदार आणि 1 खासदार गेले आहेत. आता जालन्याचे मातब्बर नेते समजले जाणार अर्जुन खोतकर हे देखील शिंदे गटात शामिल झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा जबरदस्त हादरा ठरणार आहे. तसेच भाजप नेते रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वादावरही या निमित्ताने पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :


धबधब्याच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, एकाच बुडून मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published.