ST ने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; रोख नसले तरीही मिळणार तिकीट, कसं ते पाहाच!

राज्य परिवहन महामंडळाने (state transport corporation) सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. प्रवाशांना आता फोन पे, गुगल आदी ‘युपीआय’द्वारे तिकीट काढता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाईप मशिन देण्यात आले. जुलै महिन्यात उर्वरित विभागांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रोख रक्कम जवळ न बाळगता देखील एसटी (state transport corporation) प्रवास करता येणार आहे.

एसटी प्रशासनाने काही महिन्यापूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. यात देखील काही अडचण निर्माण होत होत्या.

अनेकदा या मशिन बंद पडल्याच्या घटना देखील अनेक विभागांत घडल्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे.

पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. शिवाय नव्या मशिनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोन पे द्वारे देखील तिकीट काढता येणार आहे.

हेही वाचा :


बँकांच्या संपाबाबत मोठा निर्णय, युनियननी केली घोषणा!

Leave a Reply

Your email address will not be published.