महिलेला मिळणार इतक्या लाखांची नुकसान भरपाई

ठाणे : देशात दरवर्षी रस्ते अपघातात (road accident) अनेक लोकांचा मृत्यू होतो, तर अनेक लोक जखमी देखील होतात. या अपघातामध्ये क्वचितच असे लोक असतात ज्यांना नुकसान भरपाई मिळत असते. आता या घटनेत रस्ते अपघातात जखमी झालेल्या 48 वर्षीय महिलेला 19.60 लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) या संबंधित आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महिलेला तब्बल 9 वर्षांनी न्याय मिळणार आहे.

आदेशात काय?
ठाणे मोटार अपघात (road accident) दावा न्यायाधिकरणाने (MACT) 2013 मध्ये रस्ता अपघातात  जखमी झालेल्या 48 वर्षीय महिलेला 19.60 लाख रुपयांची भरपाई  देण्याचे आदेश दिले आहेत. MACT चे अध्यक्ष अभय जे मंत्री यांनी 14 नोव्हेंबर रोजी अशा दोन लोकांसाठी आदेश जारी केला होता. दोघांनाही संयुक्तपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पैसे देण्याचे निर्देश दिले आहेत.अर्जदाराला वार्षिक 7 टक्के दराने व्याजासह संयुक्तपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने भरण्यास सांगितले आहे.या आदेशाची प्रत सोमवारी देण्यात आली आहे.

घटनाक्रम काय?
अर्जदाराच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर परिसरात राहणारी महिला (women) तिच्या वालिव येथील चिंचपाडा येथे आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका टेम्पोने तिला धडक दिली.या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या महिलेला तिची दैनंदिन कामेही करता येत नव्हती. ही महिला व्यवसायाने अकाउंटंट असून दरमहा 34 हजार 200 रुपये कमावत होती. 7 मार्च 2013 रोजी ही घटना घडली होती.

महिलेला 19.60 लाख रुपये नुकसान भरपाई
MACT चे अध्यक्ष अभय जे मंत्री सांगतात की, त्यांच्या मते अर्जदाराची 20 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत कायमस्वरूपी कार्यक्षम अपंगत्व आणि 15 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत भविष्यातील कमाईची क्षमता कमी होण्याचा विचार करणे योग्य आहे. त्यामुळे टेम्पोच्या मालकाला महिलेला 19.60 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये उत्पन्नाच्या नुकसानाची भरपाई  तसेच इतर खर्च आणि त्रास यांचा समावेश आहे. तसेच आदेशात असेही म्हटले आहे की, प्राप्त झालेल्या रकमेपैकी 9.60 लाख रुपये जमा झालेल्या व्याजासह दावेदाराला दिले जातील आणि उर्वरित रक्कम त्याच्या नावावर पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवली जाईल.

दरम्यान ठाणे मोटार अपघात न्यायाधिकरणामुळे (MACT) महिलेला तब्बल 9 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे.

हेही वाचा: