विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागांत ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या विभागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीमुळे शेतजमीन आणि पिकांच्या नुकसानीसंदर्भांत (announce) शासनाच्या धोरणाची योग्य दिशा ठरविणे व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

विरोधी पक्षनेते पवार यांनी लिहिलेल्या पत्रात (announce) म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे देखील होऊ शकलेले नाहीत. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व आत्महत्या होऊ नये याकरिता विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या विभागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्र्यांअभावी यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही. अधिवेशन कधी होईल हे निश्चित नाही. त्यामुळे त्वरित विशेष अधिवेशन बोलवावे. ज्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सदस्यांच्या चर्चेतून तात्काळ मदत जाहीर करता येईल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Smart News :


हिंदू वेशात मुस्लीम तरुणांकडून 3 दर्ग्यांमध्ये तोडफोड; वातावरण बिघडवण्यासाठी रचला मोठा कट

Leave a Reply

Your email address will not be published.