राज्यात दारूची होम डिलिव्हरी बंद होणार?

कोरोना काळात लोकांच्या सोईसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम हळूहळू बदलण्यात येत आहेत किंवा बदलण्यात येत आहेत. राज्यात आणि देशात कोरोना काळात (home delivery) लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प होतं. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाचा ओघ अक्षरश: बंद झाला होता. त्यामुळेच देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही महसूल बुडत असल्याचे कारण देत दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.
पण दारूच्या दुकानांवर एवढी गर्दी होऊ लागली की सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली होऊ लागली होती. यावर उपाय म्हणून सरकारने पुन्हा दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करून, कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी दारूच्या होम डिलिव्हरीला (home delivery) परवानगी देण्यात आली.
आता कोरोनाची प्रकरणे खूपच कमी नोंदवली जात असताना, महाराष्ट्र सरकार दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी होणार नाही, असे पत्र दिले आहे. गृह विभागाचे म्हणणे आहे की लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली होती.
सध्या कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यात आली आहेत, त्यामुळे ही व्यवस्था मागे घेण्यात आली आहे. या पत्रात उत्पादन शुल्क विभागाला दारू उद्योगातील सर्व संबंधितांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
गृहखात्याच्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारला आता दारूच्या होम डिलिव्हरीवर बंदी घालायची आहे. होम डिलिव्हरीवर कोणताही डेटा उपलब्ध नाही. महामारीच्या काळात लाखो लोकांनी घरून दारू मागवायला सुरुवात केली.
उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग म्हणतात की सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान होम डिलिव्हरीची परवानगी होती. दारुची होम डिलिव्हरी करायची की नाही या सर्व बाबींचा विचार करून सरकार लवकरच अंतिम निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आरामात घरबसल्या दारून ऑर्डर करुन एन्जॉय करणाऱ्यांना आता पुन्हा घराबाहेर पडून आपली सोय करावी लागणार आहे.
हेही वाचा :