छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला(attack) केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले. IED स्फोटात 9 जवान शहीद झाले आहेत. 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांचे पथक ऑपरेशन करून परतत होते.
दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर हा हल्ला(attack) केला. दुपारी 2:15 वाजता, नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले.
हेही वाचा :
“मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या…
बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच? संभाजीराजेंचा अजित पवारांना थेट सवाल: “त्यांना संरक्षण का?”
नागरिकांना OYOचा मनस्ताप ! OYO बंद करण्यासाठी आमदारांचाही ग्रीन सिग्नल