लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल

लहान मुलं अनेकदा खाण्या-पिण्यासाठी कुरकुर करत असतात. कितीही (tiffin)चांगलं काही बनवून दिलं तरी मुलं आपला डबा काही रिकामा आनंद नाहीत. हा डबा रिकामा बघता यावा यासाठी महिला अनेक टेस्टी आणि लहान मुलांच्या आवडीच्या रेसिपीच्या शोधात असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक चविष्ट रेसिपी सांगत आहोत जी तुमच्या मुलांना फार आवडेल. शिवाय हा पदार्थ झटपट बनून तयारही होईल त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी टिफिनसाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मलाई टोस्ट. हा क्रिमी चवदार पदार्थ फार निवडक साहित्यापासून तयार होतो. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव फार आवडेल. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार करू शकता. फ्रेश क्रीम आणि ब्रेडपासून हा पदार्थ तयार केला जातो. चला तर मग मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य
फ्रेश क्रीम – 1 कप
ब्रेड पांढरा किंवा तपकिरी – 4 काप
साखर – 2-3 चमचे चवीनुसार
वेलची पावडर – 1/4 टीस्पून
तूप किंवा लोणी – टोस्टिंगसाठी
मनुका आणि बदाम पर्यायी – सजावटीसाठी
जेवणाला द्या राजस्थानी तडका, घरी बनवा रसरशीत(tiffin) गट्ट्याची भाजी; याची चव चिकन करीलाही सोडेल मागे

कृती
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात फ्रेश क्रीम घ्या
यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण वाढवता किंवा कमी करता येते
हे मिश्रण काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा ज्यामुळे ते थंड होईल आणि त्याची चव आणखीन वाढेल
आता ब्रेडचे स्लाईस घ्या. तुमची इच्छा असल्यास तुम्ही ब्रेडच्या बाजू काढू शकता
आता ब्रेडला हलके दाबा आणि सपाट करा जेणेकरून क्रीमचे मिश्रण यावर सहज लावता येईल
ब्रेडच्या एका स्लाईसवर चमच्याने क्रीमचे मिश्रण पसरवा.(tiffin) लक्षात ठेवा की क्रीमला जास्त जाड थर लावू नका,
अन्यथा टोस्ट करताना ते वाहू शकते. क्रीम लावल्यानंतर दुसरा स्लाइस वर ठेवा आणि सँडविचप्रमाणे दाबा
नॉन-स्टिक तवा किंवा तवा गरम करा. त्यात थोडं तूप किंवा लोणी घाला
आता तव्यावर क्रीमयुक्त ब्रेड सँडविच ठेवा. मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
एक बाजू टोस्ट झाली की ती उलटा आणि दुसरी बाजूही टोस्ट करा
टोस्ट तयार झाल्यावर प्लेटमध्ये काढा. तुम्हाला हवे असल्यास वर मनुके आणि बदामाचे तुकडे टाकून सजावट करू शकता
मलाई टोस्ट गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करा, हा स्वादिष्ट नाश्ता चहा किंवा कॉफीसोबत फार अप्रतिम लागतो

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी