कोल्हापुरातील भीषण दुर्घटना; भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर(river camp) असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शाळकरी मुलाला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, रा. मुरगूड ता. कागल) रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34) हर्ष दिलीप येळमल्ले (वय 17, दोघे रा. अथणी, कर्नाटक) आणि सविता अमर कांबळे (वय 27 रा. रुकडी, ता. हातकलंगले) अशी त्यांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह गावकऱ्यांनी शोधून काढले आहेत. हर्षचा शोध काल रात्री नऊ वाजेपर्यंत सुरुच होता. आज पुन्हा रेस्क्यू पथकाकडून शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये(river camp) मुरगूडचे जितेंद्र लोकरे त्यांची बहीण, बहिणीचा मुलगा आणि मामाचा मुलीचा समावेश आहे. आणूर गावच्या जत्रेसाठी हे सर्वजण जमले होते. काल (17 मे) दुपारच्या सुमारास ते वेदगंगा नदीकडे गेले होते. काळम्मावाडी धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा होता.

कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीत उतरले असतानाच हर्ष खोल पाण्यामध्ये बुडाला. आरडाओरडा करण्यात आल्यानंतर शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला. पाठोपाठ रेश्मा, साधना व सविता सुद्धा उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने भीतीपोटी मिठी मारल्याने नदीत बुडाले.

चौघे बुडताना काठावर असलेल्या जितेंद्र लोकरे यांच्या मुलीने पाहिल्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी मासे पकडण्यास आलेल्या अवधूत यांनी गावातील प्रमोद पाटील यांना बोलावून नदीत उडी मारली. साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आलं. तसेच तिघांचे मृतदेह त्यांनी काठावर आणले. हर्षला शोधण्याचे काम सुरू होते. मात्र रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा एकदा शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान, परदेशवारीवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तसेच कागलच्या तहसीलदारांशी सुद्धा संपर्क साधला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिल्या आहेत.

हेही वाचा :

माझी वाट लागलीये प्लीज…, हात जोडून रोहित शर्माने कोणाला केली विनंती?

कोल्हापूर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद