बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण(politics) चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्याकारांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत झालेल्या मोर्चात मनोज जरांगे यांनी बोलताना मंत्री धनंजय मुंडेंवर(politics) टीका करत एकेरी भाषेत उल्लेख केला होता त्यानंतर जरांगे यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर आता मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी राजेंद्र कोंढरे यांनी जरांगेंनी बोलतांना काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, त्यांच्या सहकाऱ्यांशी माझं कालच बोलणं झालं आहे त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्या पुरता तो संघर्ष मर्यादित आहे. तो संघर्ष दोन समाजामध्ये जाऊ नये अशी आमची भावना आहे. परंतु एखादी वाईट प्रवृत्ती एखादी भूमिका घेते दहशतवाद करते तलवारी काढते त्याच्यावर कोणी बोलणारच नाही आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यावर त्याच्यावर वक्तव्य होण हे देखील चुकीच आहे. असं ते म्हणाले.
पुढे बोलताना राजेंद्र कोंढरे म्हणाले की, जरांगे पाटलांनी यामध्ये निश्चित काळजी घ्यावी असे आमचे या ठिकाणी आवाहन आहे. परंतु अपोजिट साईटने आज तुम्ही सोशल मीडिया बघा जिथे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रील येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या रिल्सवर बंदी देखील घातली नाही. मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचे स्वरूप येतं. त्यातून समाजामध्ये विसंवाद वाढत जातात. ही परिस्थिती आजही आहे. आज ज्या ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान आहे. पोलीस यंत्रणा आहे. सायबरची विन आहे त्या त्या जिल्ह्यातील जे पेजेस आहेत त्यावर कारवाई केली पाहिजे. असेही यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले.
परभणीत झालेल्या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे असे आरोप ठेवून परळी शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
सलमान खानच्या जीवाल पुन्हा धोका? सुरक्षेत वाढ अन् गॅलेक्सीच्या बाल्कनीत बसवली बुलेटप्रूफ काच
Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स
“…की फडणवीस, पवार निर्णयच घेत नाहीत?”; बीड प्रकरणात संभाजीराजे छत्रपती कडाडले