“प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे…”, मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतल्या अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी आणि अधिपतीच्या वडिलांसह प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची भूमिका अभिनेते(actor) स्वप्नील राजशेखर साकारत आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे स्वप्नील राजशेखर सध्या त्यांच्या उपरोधिक विधानामुळे चर्चेत आले आहेत.

सामाजिक विषयावर आपलं परखड मत मांडणाऱ्या स्वप्नील राजशेखर यांनी रस्त्यावरील खड्ड्यावर आपलं मत मांडलं आहे. कलाकार(actor) म्हटल्यावर नेहमीच कायमच रोडवरील प्रवास आलाच. त्यातल्या त्यात रोडवरील प्रवास म्हटल्यावर रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीच्या समस्या, ट्राफिकसह वेगवेगळ्या गोष्टी आल्याच. याच सर्व गोष्टींचा आधार घेत अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. अभिनेते स्वप्नील राजशेअर यांनी प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर करत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपलं मत काहीशा वेगळ्या अंदाजात आणि कोल्हापुरी भाषेत मांडलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वप्नील राजशेखर म्हणतात, “काहीजण रोज उठून रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांना त्या सगळ्यांना मला एक सांगायचंय, अहो… वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे सगळे खड्डे जपलेत, राखलेत हायवेला, शहरातले आणि गावातले ते काही उगाचंच नाहीये. यामागे एक विचार आहे. तो विचार समजून घ्या. किती अशी माणसं आहेत हो… ज्यांचं अगदी बुळबुळीत रस्त्यासारखं आयुष्य आहे.

तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यामध्ये कितीतरी खड्डे-डबरे येतात. महागडी गाडी खरेदी केलेली असते, हेल्थ विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो. दर वीकेंडला बायको-मुलांना घेऊन हिल स्टेशनला जावं लागतं, किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावं लागतं. आपलं पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची फी भरावी लागते या सगळ्यात मागे हटून चालणार नाही… म्हणून हे खड्डे.”

“परवा आमचे एक आजोबा गेले असं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून लोक घरी घेऊन जात होते. वाटेत एक खड्डा आला, रुग्णवाहिका आदळली आणि आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस परत आला… लक्षात घ्या, एका माणसाचा जीव वाचला या खड्ड्यांमुळे… लोक उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजलं पाहिजे… प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवलाय.” अशी उपरोधिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मत मांडलं आहे.

स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून अभिनेत्याला नेमकं काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय याचा मतितार्थ सर्वांनाच लक्षात आलेला आहे. त्यांचा हा कोल्हापुरी लहेजा अनेकांना भावला आहे.

हेही वाचा :

जगातील सर्वात नशिबवान माणूस: रस्ता ओलांडताना घडलेलं चमत्कारीक प्रकार!

व्हिसाचे पेमेंट्ससाठी मार्गदर्शन: सुरक्षितपणे टॅप अँड पे करा

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली