आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (submitted)घेऊन रांजणी, ता. कवठेमहांकाळ येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या भेटीत प्रकल्पाची सद्यस्थिती, यापूर्वी झालेल्या घोषणांची अंमलबजावणी, जमिनीची उपलब्धता, रोजगार निर्मितीची शक्यता, तसेच दळणवळणाच्या सोयी याविषयी सखोल माहिती देण्यात आली.

रांजणी येथील ड्रायपोर्ट हा राज्य सरकारचा आयकॉनिक प्रकल्प असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष देण्याची ग्वाही दिली आहे. या प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेला प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. यावेळी आमदार गोपीचंद(submitted) पडळकरही उपस्थित होते.
प्रकल्पाविषयी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी या उपक्रमाचा कवठेमहांकाळ व जत या दोन्ही तालुक्यांना मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. त्यांनी या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील आणि संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पावर वैयक्तिक लक्ष ठेवून लवकरच एक विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत प्रकल्पाची पुढील दिशा आणि निर्णय घेतले जाणार आहेत.या महत्त्वपूर्ण भेटीसाठी उपस्थित राहणारे संदीप गिड्डे पाटील, प्रदेश सरचिटणीस, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र, (submitted)यांनी शेतकरीहितासाठी रांजणी ड्रायपोर्टसारख्या प्रकल्पांच्या गतीसाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
माधुरीच्या देखभाल आणि पुनर्वसनासाठी वनताराचे अधिकृत निवेदन
चिपरीत २२ वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याने खळबळ
कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात