बोगस मतदान झाल्याच्या आरोपावरून कोल्हापूरातील मतदान केंद्रावर गोंधळ!

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार(mental confusion) पडत आहे. या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान काही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर गोंधळ, हाणामारीच्याही घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूरमधील एका मतदान केंद्रावरही बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यावरून तेथील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पाठोपाठ कोल्हापूर मतदारसंघात(mental confusion) एका केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून वाद उफाळला आहे.

परिणामी कोल्हापूर शहरातील पद्माराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखले होते. पोलिसांना पाचारण केले गेले आणि मतदान थांबवण्याची मागणी केली. मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप यावेळी केला गेला. यावेळी शिवसैनिक आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले.

याशिवाय कोल्हापूरातच एका मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभा राहिलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटनाही घडली आहे. कोल्हापूरच्या उत्तरपेठेतील रमाबाई आंबेडकर प्रशालेच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली.

याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. या मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत हा राडा झाला. परिणामी या मतदान केंद्रातील मतदान काही काळासाठी बंद करावे लागले होते.

हेही वाचा :

हातकणंगलेमध्ये गोंधळ, धैर्यशील माने आणि सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कोल्हापुरात मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या