pan card | तुमच्या PAN Card चा कुणी गैरवापर करतंय का?

पॅन कार्डच्या फसवणुकीचे (PAN Card ) सर्वाधिक लोक बळी पडले असून यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. फिनटेक अॅपद्वारे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवण्यासाठी सेलिब्रिटींसह अनेक लोकांनी त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

अभिनेता राजकुमार राव यांने नुकतेच ट्वीट करुन माहिती दिली होती की, त्याच्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे, कारण कोणीतरी त्याच्या नकळत त्याचा पॅन नंबर वापरून 2500 रुपयांचे कर्ज घेतले आहे. यापूर्वी आणखी एक अभिनेत्री सनी लिओनीनेही अशाच प्रकारची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. तुमच्या पॅनचा कोणी गैरवापर केला आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर झाला आहे की नाही हे तुम्ही अशा प्रकारे जाणून घेऊ शकता.(pan card)

फॉर्म 26A वापरा फॉर्म 26A दरवर्षी आयकर विभागाला माहिती देतो. यामध्ये आयकर रिटर्न आणि पॅन कार्ड क्रमांक यांसारख्या आयकर संबंधित रेकॉर्डमधून केलेले सर्व आर्थिक व्यवहार समाविष्ट आहेत. फॉर्म 26A तपासून तुम्ही तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का हे शोधू शकता आणि त्यानंतर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

फॉर्म 26A कसा डाउनलोड करणार? >> ‘ई-फायलिंग’ पोर्टलवर लॉग इन करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या >> ‘My Account’ मेनूवर जा, नंतर फॉर्म 26AS (टॅक्स क्रेडिट) शोधा आणि लिंकवर क्लिक करा >> डिलक्लेमर वाचल्यानंतर ‘कन्फर्म’ वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला TDS-CPC पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. >> TDS-CPC पोर्टलवरील ‘Agree’ बटणावर क्लिक करा >> ‘Proceed’ बटणावर क्लिक करा >> View Tax Credit (फॉर्म 26AS) बटणावर क्लिक करा >> तुमचे मूल्यांकन वर्ष निवडा आणि नंतर ‘View Type’ (HTML, text किंवा PDF) वर क्लिक करा. येथे तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही पर्यायावर क्लिक करू शकता. >> ‘View / Download’ बटणावर क्लिक करा. तुम्हाला फॉर्म मिळेल.

हेही वाचा :


film industry: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *