मुंबईत LIC ऑफिसमध्ये भीषण आग!

मुंबईसह उपनगरामध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना ताजी असताना आणखी एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे.(lic office)

विलेपार्ले पश्चिम येथील LIC (lic office) इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

याआधी नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना समोर आली. रासायनिक कंपनीला लागलेली आग नियंत्रणात मिळवण्याचं काम सुरू आहे. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :


बापरे! सूर्यकुमार यादवने मैदानावर घेतली Viagra ची गोळी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *