मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio recharge plan) यूजर्ससाठी अनेक शानदार प्रीपेड प्लान ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलियोत प्रत्येक सेगमेंटमध्ये जबरदस्त बेनिफिट्स देणारे प्लान्स उपलब्ध आहेत. स्वस्त प्लान्सच्याबाबतीत देखील कंपनी भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देते. कंपनीकडे अवघ्या २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे काही शानदार रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएससह अनेक बेनिफिट्स देत आहे. Reliance Jio च्या या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओचा ११८ रुपयांचा प्लान
जिओच्या ११९ रुपयांच्या प्लानची (recharge plan) वैधता १४ दिवस आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी याप्रमाणे एकूण २१ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, एकूण ३०० एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
जिओचा १४९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानची वैधता २० दिवस आहे. यात दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २० जीबी डेटा मिळेत. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
जिओचा १७९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २४ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. अशाप्रकारे, २४ दिवसांसाठी एकूण २४ जीबी डेटा मिळेल. यात दररोज १०० मोफत एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्रीपेड प्लानमध्ये देखील तुम्हाला जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल.
जिओचा १९९ रुपयांचा प्लान
२३ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ३४.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. यात दररोज १०० मोफत एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्रीपेड प्लानमध्ये देखील तुम्हाला जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
हेही वाचा :