पुन्हा स्वस्त झाला OnePlus 9 सीरीजचा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन

smartphone

तुम्हाला जर OnePlus चे स्मार्टफोन्स आवडत असतील आणि ते खरेदी करायचा तुमचा प्लान असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. OnePlus कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 Pro 5G smartphone च्या किंमतीत पुन्हा कपात केली आहे. किमतीतील नवीन कपात आठवड्यातील दुसरी आहे. सर्वात प्रीमियम OnePlus 9 series फोन, OnePlus 9 Pro 5G, गेल्या वर्षी मार्चमध्ये ६४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होत.

काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनवर ५,००० रुपयांची सूट मिळाली होती आणि अलीकडेच कंपनीने स्मार्टफोनच्या (smartphone) किंमतीत आणखी कपात केली आहे. OnePlus 9 Pro 5G दोन प्रकारांमध्ये येतो – ८ GB + १२८ GB आणि १२ GB + २५६ GB.

पहिल्या किंमतीत कपात केल्यानंतर, स्मार्टफोन ५९,९९९ रुपये आणि ६४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होता. आता, स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी ५,८०० रुपयांची कपात झाली आहे. किमतीत कपात केल्यानंतर, ८ GB व्हेरिएंट आता ५४,१९९ रुपयांना उपलब्ध आहे आणि १२ GB व्हेरिएंटची किंमत आता ५९,१९९ रुपये आहे.

OnePlus 9 Pro 5G मध्ये हे आहे विशेष:

OnePlus 9 Pro 5G ८ GB/ १२ GB RAM सह जोडलेल्या ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरद्वारे Suported आहे. OnePlus 9 5G 3216 X 1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ -इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले दाखवतो. डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लासने संरक्षित आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OxygenOS 12 चालवतो आणि ४५०० mAh बॅटरी पॅक करतो.

जी, ६५ W जलद चार्जिंग आणि ५० W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोटो ग्राफीसाठी स्मार्टफोन ४८ MP प्रायमरी + ५० MP अल्ट्रा वाइड + ८ MP टेलिफोटो + २ MP मोनोक्रोम सेन्सरच्या क्वाड रियर कॅमेर्‍यांसह सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये १६ MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.


हेही वाचा :


“एवढे सामने खेळून पण समजत नाही का?”


पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले


गायकवाडांची सूनबाई..! सायली संजीवचा फोटोशूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *