108MP कॅमेरा असलेल्या Redmi स्मार्टफोनवर 16,500 रुपयांची सूट…

Smart News:-  108MP कॅमेरा असलेल्या Redmi स्मार्टफोनवर 16,500 रुपयांची सूट...

Smart News:- भारतात गेल्यावर्षी लाँच झाला आहे. वर्षभर जुना असला तरी या स्मार्टफोनमधील 108MP कॅमेरा, Snapdragon 732G प्रोसेसर, 6GB RAM आणि 5020mAh बॅटरी हे स्पेसिफिकेशन्स लोकांना अजूनही आकर्षित करत आहेत.

त्यामुळे तुम्ही जर कमी बजेट बेस्ट कॅमेरा असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 10 Pro Max तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

Redmi Note 10 Pro Max ची किंमत आणि ऑफर

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. फोनच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 14,500 रुपये वाचवू शकता.

Redmi Note 10 Pro Max चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन असलेला हा डिस्प्ले 1200 निट्स पीक ब्राईटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि 128 जीबी UFS2.2 फ्लॅश स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमधील 5020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या रेडमी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हीटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरा देण्यात आले आहेत. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो.

Smart News:-

‘तो’ आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही, भारताचा अंतर्गत प्रश्न – बांगलादेश


‘हसता हा सवता’: प्रियदर्शन जाधवचं नवं नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला


केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या.


सांगली: शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप


भारतीय रूपयाची ऐतिहासिक घसरण

Leave a Reply

Your email address will not be published.