फडणवीसांना डेटा काढून देणारा तेजस मोरे आहे कोण?

स्टिंग आपरेशनमधील (Sting Operation) फुटेजद्वारे विधानसभेत सरकारी वकील आणि महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या सगळ्यामध्ये फडणवीस यांना हा सर्व डाटा (data)पुरवण्याचे जळगाव कनेक्शन समोर आले असून, तेजस मोरे याने ही सर्व माहिती फडणवीसांना पुरवल्याचा आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, तेजस मोरे हा नेमका कोण आहे हे आपण जाणून घेऊया.
तेजस मोरे कोण?
फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे स्टिंग ऑपरेशन करण्यामागे तेजस मोरे याचा हात असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. तेजस मोरे हा जळगावातील रहिवासी असून, सध्या मोरे याचे वास्तव्य जळगावात नसून, त्याचे घर भाड्याने देण्यात आल्याची माहिती आहे. मोरे याचे जळगावमधील जिल्हा परिषद कॉलनी येथे घर असून, मोरे कुटुंबिय बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. गेल्या सहा ते सात वर्षांपासून तेजस हा पुण्याला राहत असल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. तेजस मोरे हा जळगाव जिल्हा परिषद येथील अभियंत्याचा मुलगा असून, त्याच्यावर यापूर्वीही जळगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय पुण्यातल्या एका इमारत बांधकाम घोटाळ्यातही तेजसचं नाव आहे.
“स्टिंग ऑपरेशनचं ‘जळगाव’ कनेक्शन”
चव्हाण म्हणाले, “या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी ज्या केसचा आधार घेतला आहे, त्याची (data)कागदपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये दिसून येतं की गिरीश महाजनांची त्या गुन्ह्यात काय भूमिका आहे. याचा तपास सुरु असून तपास अधिकाऱ्यांनी ही फाईल हायकोर्टात मांडली आहे”
माझ्या कार्यालयात नेहमी येणारा आशील तेजस मोरे (Tajas More) यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्याचा जामीन अर्ज माझ्याकडे होता, त्याचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, ते घड्याळ त्यानंच आणलेलं होतं. त्यानं मला एसी बसवून देतो असंही म्हटलं होतं. पण मी त्याला नकार दिला होता.
त्यानंतर त्यानं स्मार्ट टीव्ही बसवतो असं सांगितलं, पण त्यालाही मी नकार दिला. कारण मी आजतागायत कोणाकडूनही भेटवस्तू स्विकारलेली नाही. त्यानं मला विविध प्रकारे प्रलोभनं दिली. पण मी प्रत्येक वेळी त्याला नकार दिला. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा मी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. त्याची फी देखील अजून बाकी आहे. तो माझा आशील होता, तो जळगावचा होता. त्यामुळं त्याला हाताशी धरुन विरोधकांनी हे संपूर्ण षडयंत्र रचलेलं आहे. चौकशीत हे पूर्णपणे उघड होणार आहे.
हेही वाचा :