मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी महाविकास आघाडीची अतिभव्य सभा

केंद्रातील मोदी आणि राज्यातील मिंधे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील(government) जनतेत प्रचंड रोष आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत असताना निवडणूक प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीची अतिभव्य सभा 17 मे रोजी वांद्रे येथील ‘बीकेसी’ मैदानावर होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी ‘इंडिया’ आघाडीच्या दिग्गज नेत्यांची तोफ धडाडणार असल्यामुळे या सभेकडे देशभराचे लक्ष लागले आहे. ‘देशाला हुपूमशाहीकडे नेणारे मोदी सरकार चले जाव’ असा बुलंद नारा या सभेत दिला जाईल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता मार्च महिन्यात(government) दादरच्या छत्रपती शिवाजी मैदानावर झाली होती. या सांगता सभेतून राज्यात महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पह्डला होता. या सभेतून केंद्रातील मोदी व भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकण्यात आले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता बीकेसीतील महाविकास आघाडीच्या सभेतून होईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांतील प्रचार सभांसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत महायुतीच्या विरोधात रान उठवले आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व सभांना राज्यात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजप आणि मिंध्यांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व प्रचार सभांमधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जबरदस्त घणाघात केला आहे. आता ‘बीकेसी’तील प्रचाराच्या सांगता सभेत भाजपवर अखेरचा प्रहार होईल. ‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. महाविकास आघाडीच्या सभेत होणाऱया अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.

देशाला हुपूमशाहीकडे नेणाऱया भाजप सरकारविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. सर्वसामान्यांना न्याय व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकत्र आली असून या सभेतून भाजपवर शेवटचा भीमटोला हाणला जाईल. या सभेच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांच्यावर आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या शनिवारी नंदुरबार येथे झालेल्या प्रचारसभेस अलोट गर्दी उसळली. या तुडुंब गर्दीचा व्हिडीओ का@ँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, अशी पह्टो कॅप्शन त्यांनी दिली आहे.

हेही वाचा :

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस

भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न, त्यांना केवळ मीच दिसतोय; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप