‘मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी(politics) यांच्यावर सडकून टीका केली. “मोदीजी तुम्ही 2014 साली तुम्ही पंतप्रधान व्हावे, या पत्रावर माझी सही घेतली होती. 2019 मध्ये देखील सही घेतली होती. पण तुम्ही काल जे बोललात त्यामुळे मी तुम्हाला क्षमा करु शकत नाही. तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. एवढंच नाही तर तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. नकली संतान? अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का? मग कशाला ही थेरं करत आहात? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल?

2014 साली ज्यादिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईत(politics) गेलो त्याचदिवशी तुम्ही एकनाथ खडसे यांनी फोन करुन युती तुटली सांगायला लावली, मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल?”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतात की, मोदींच्या इंजिनाला विकासाचे डब्बे आहेत. अहो विकासाचे डब्बे सोडून द्या. आम्ही गेली 10 वर्ष पाहतोय, तुमच्या इंजिनला केवळ डब्बेच लागत आहेत. पण तुमच्या डब्ब्यांना खाली भ्रष्टाचाराची चाके आहेत ना. त्याचं काय करताय तुम्ही? संपूर्ण देशाने ठरवलं आहे की, आता हे इंजिनच नको. गुजरातला पाठवून द्या. ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार नेले त्याच वाटेने मोदीजींचे इंजिनही गुजरातला पाठवून द्या. कारण गेली 10 वर्ष नुकसत्या वाफा नाही तर थापा मारत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभत नाही. माझ्या महाराष्ट्रात ही भाषा तर चालूच शकत नाही. कारण हा मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकमेकांचा आदर करणारा आहे. पंढरपुराच्या वारीमध्ये फुगड्या खेळल्यानंतर एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रात आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते नेमकं ठरवा. आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलंत. शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, तरीदेखील कधी मला डोळा मार तर कधी शरद पवार यांना डोळा मार”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की, या आमच्याकडे. एका ठिकाणी बोलायचं की ही नकली शिवसेना आहे. एका ठिकाणी बोलायचं ही नकली राष्ट्रवादी आहे. मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. हे एवढे घाबरले आहेत, कारण त्यांना कळून चुकलं आहे की, ते आता परत दिल्ली बघत नाहीत. महाराष्ट्र त्यांना दिल्ली बघू देणारही नाही”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

हेही वाचा :

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलं कोर्ट मॅरेज? फोटो शेअर करत म्हणाली….

मी कुठल्या पाटलाच्या मागे हे 4 जूनला समजेल : विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले

मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी; कोल्हापूरचा ‘तेरे नाम’: मनोज जरांगे