माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट

ठाण्यात 17 वर्षीय गतिमंद मुलीच्या मरणयातना असह्य झाल्याने, तिच्या आई(Mother) आणि आजीने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नौपाडा पोलिसांनी आजीला अटक केली असून, आई फरार आहे. 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

यशस्वी पवार नावाची ही मुलगी जन्मापासून अपंग, गतिमंद आणि आजारी होती. तिची आई(Mother) स्नेहल राजेश पवार (35) आणि आजी सुरेखा महागडे यांच्यासोबत ठाण्यातील शिवाजी पथ, जगताप चाळ भागात राहत होती. 19 फेब्रुवारीला तिला औषध पाजून ठार मारल्याची तक्रार मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन (42) यांनी नौपाडा पोलिसांत दिली.

पोलिस उपनिरीक्षक रणभिसे आणि पथकाने मुलीच्या घरी जाऊन तिची आजी सुरेखा हिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मापासूनच आजारी आणि अपंग असलेल्या मुलीला 15 फेब्रुवारीपासून जास्त त्रास होत होता.

स्नेहलने याला कंटाळून 19 फेब्रुवारीला रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या. यात तिचा मृत्यू झाल्यानंतर 20 फेब्रुवारीला पहाटे सातारा जिल्ह्यातील पसरणी गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार उरकले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

काळजी घ्या २ दिवस उष्णतेचा इशारा राज्यभरात IMD कडून अलर्ट

लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेणार?

iPhone News :499 रुपयांत आयफोन ऑनलाईन शॉपिंगवर स्वस्तात ऑफर