Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स

मोटोरोला या भारतातील बेस्ट 5G स्मार्टफोन ब्रँडने moto g05 हा एंट्री-लेव्हल 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. प्रीमियम सेगमेंटमधील आघाडीच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या (smartphone)स्मार्टफोनमध्ये सेगमेंटमधील सर्वात ब्राईट 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे.

हा फोन 1000 निट्स ब्राइटनेस, पंच-होल डिझाइन आणि स्मूथ 90Hzच्या रिफ्रेश रेटसह एक रंगीत अद्भुत अनुभव प्रदान करतो. याला सेगमेंटमधील सर्वोत्तम Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. या फोनमध्ये सेगमेंटमधील एकमेव ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे Dolby Atmos आणि Hi-Res Audio ने सुसज्ज आहेत.

हा आपल्या रेंजमधील एकमेव (smartphone)स्मार्टफोन आहे ज्यात Android 15 आहे आणि 2 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सची हमी मिळते. प्रीमियम व्हेगन लेदर फिनिशसह, दोन Pantone मान्यताप्राप्त रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनमध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे.

याला MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरचा सपोर्ट आहे आणि यात 5200mAh बॅटरी आहे, जी 2 दिवसांपर्यंत टिकते. यासोबतच 18W TurboPower चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

स्मार्टफोन अ‍ॅडॅप्टिव्ह ऑटो मोड कंटेंटनुसार रिफ्रेश रेट 90Hz वरून 60Hz पर्यंत ॲडजस्ट करतो, ज्यामुळे बॅटरीचा कार्यकाळ वाढतो. स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये 7x Bass Boost सह Dolby Atmos आणि Hi-Res Audio उपलब्ध आहे.

यामुळे सेगमेंटमधील अतुलनीय ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव मिळतो. याशिवाय, डिस्प्लेमध्ये वॉटर टच टेक्नॉलॉजी आहे, जी ओल्या किंवा घामट हातांसाठी टच सेन्सिटिव्हिटी ॲडजस्ट करते, ज्यामुळे अखंड टच अनुभव मिळतो.

प्रिमियम मटेरियल्स वापरून विचारपूर्वक तयार केलेला मोटो g05 दीर्घकाळ टिकण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. Pantone मान्यताप्राप्त रंग आणि व्हेगन लेदर फिनिशमुळे या फोनला लक्झरिअस लूक मिळतो. हा डिव्हाइस फॉरेस्ट ग्रीन आणि प्लम रेड या दोन ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध आहे. अतिरिक्त संरक्षणासाठी या फोनला IP52 रेटिंग आहे.

मोटो g05 हा आपल्या श्रेणीतला एकमेव स्मार्टफोन आहे, ज्यात नवीनतम Android15 आहे. यामुळे वापरकर्त्यांना Android मधील अत्याधुनिक नवकल्पनांचा अनुभव घेण्याची संधी मिळते.

Android15 सह, वापरकर्त्यांना सुधारित प्रायव्हसी, मजबूत सुरक्षा, आणि फ्लेक्झिबल पर्सनलायझेशन पर्यायांचा लाभ मिळतो, ज्यामुळे डिव्हाइस कस्टमायझेशन एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. मागील जनरेशन्ससोबत तुलना करता, Android15 सुधारित प्रायव्हसी नियंत्रण, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये, आणि डिव्हाइस वैयक्तिकरणासाठी अधिक लवचिकता प्रदान करते.

या फोनमध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम 50MP कॅमेरा सिस्टीम आहे, जिला क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानाचा सपोर्ट आहे. हा कॅमेरा कोणत्याही प्रकाशत व्हायब्रंट फोटो कॅप्चर करतो. यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये फेस रिटच फीचर आहे. या फीचरमुळे प्रत्येक वेळी स्पष्ट आणि अधिक चांगले सेल्फी येतात. मोटो g05ची पोर्ट्रेट फोटोग्राफीही उत्कृष्ट आहे.

या शिवाय, टाइम लॅप्स, लाईव्ह फिल्टर, पॅनोरमा आणि लेव्हलर यांसारख्या रोमांचक वैशिष्ट्यांमुळे तुमचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक समृद्ध होतो. Google Photo Editor, Magic Unblur, Magic Eraser आणि Magic Editor यांसारखी अतिरिक्त साधने वापरून, वापरकर्ते सहजपणे अप्रतिम आणि व्यावसायिक दर्जाचे फोटो तयार करू शकतात.

मोटो g05 मध्ये MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसर आहे. यामध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB UFS2.2 स्टोरेज आहे. RAM Boost फीचरच्या मदतीने रॅम 12GB पर्यंत वाढवता येतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग अधिक सहज होते. याशिवाय, डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते आणि डिव्हाइसमध्ये ट्रिपल सिम कार्ड स्लॉटसुद्धा आहे, ज्यामुळे अधिक फ्लेक्झिबिलिटी मिळते.

मोटोरोला मोबिलिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री टी.एम. नरसिंहन म्हणाले, “मोटो g05 या क्रांतिकारी एंट्री-लेव्हल स्मार्टफोनचे लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रगत डिस्प्ले, प्रीमियम डिझाइन आणि पॉवरफुल कॅमेरासह, हा स्मार्टफोन अप्रतिम किंमतीत अतुलनीय अनुभव प्रदान करतो.

मोटो g05 एंट्री-लेव्हल स्मार्टफोनसाठी एक नवा अनुभव ठरवतो, जो तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे.”

या सर्व अद्वितीय वैशिष्ट्यांना बळकटी देणारी 5200mAh क्षमतेची मोठी बॅटरी यो फोनमध्ये आहे. चार्जिंगची वेळ आली, तर डिव्हाइस TurboPower18W चार्जिंगसह जलद चार्ज होते. मोटो g05 फॉरेस्ट ग्रीन आणि प्लम रेड या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइन आहे.

मोटो g05 एकाच स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये 4GB रॅम + 64GB इन-बिल्ट स्टोरेज आहे. 13 जानेवारी 2025 पासून दुपारी 12 वाजता Flipkart, Motorola.in आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सेल सुरू होईल. 4GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत 6,999 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अधिक कमी किंमतीत खरेदी करू शकता.

हेही वाचा :

गृहिणींना मोठा दिलासा! आठवडाभरात लसूण, कांद्याचे दर उतरले; सध्या किंमत किती?

VIDEO : जाहीर सभेत ‘आप’ नेत्याचा संताप: बेल्टने स्वतःला मारून घेतलं

मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???