सिनेसृष्टीवर शोककळा! दारू समजून कीटकनाशक प्राशन केले, अभिनेत्याचा मृत्यू

दारू(alcohol) समजून कीटकनाशक प्राशन केल्याने एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. एका छोट्याशा चुकीने अभिनेत्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. अभिनेता रणदीप सिंह भांगू याच्या निधनाने पंजाबी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 32 व्या वर्षी रणदीपचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रणदीप भांगूने भगत पूरण सिंग यांच्या जीवनावर आधारीत ‘ए जनम तुम्हारे लेखे’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. रणदीप भांगूच्या प्रमुख चित्रपटांमध्ये परोना, दूरबीन, क्रेझी तब्बर, उन्नी-इक्की, लंबांड दा लाना, पिंड आला स्कूल आणि ढोल रत्ती आदी चित्रपटांमध्ये काम केले.

शनिवारी, (22 जून रोजी) ही घटना घडली. रणदीप भांगूच्या अकाली निधनाची बातमी पसरताच पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. अभिनेता करमजीत अनमोल याने सोशल मीडियावर पहिल्यांदा त्याच्या निधनाची माहिती दिली.

पंजाबी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या पॉलिवूडच्या फेसबुक पेजवर रणदीपच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. ‘अत्यंत जड अंत:करणाने, या नश्वर जगाचा निरोप घेणारा तरुण अभिनेता रणदीप सिंह भांगू यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करत असल्याचे सोशल मीडिया पेजवर नमूद करण्यात आले. रणदीप सिंह भांगूच्या पार्थिवावर रविवारी त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

रणदीपच्या मृत्यूबाबत पोलीस तपास करत आहेत. अभिनेता रणदीप हा मागील काही दिवसांपासून दारूचे सेवन करत होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दारूच्या नशेत असताना अभिनेत्याने आपला जीव धोक्यात घातला. प्रत्यक्षात त्याने मद्यधुंद अवस्थेत शेतात मोटारीवर ठेवलेली कीटकनाशकाची बाटली दारू(alcohol) समजून प्यायली. यानंतर, अभिनेत्याची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

रणदीप भांगू हा चांगला अभिनेता होताच शिवाय, तो एक चांगला कबड्डीपटूही होता. त्याने बाबा अजित सिंग जुझार सिंग कबड्डी अकादमी चमकौर साहिबसाठी अनेक सामने खेळले.

भांगू चेतना कला मंच चमकौर साहिबशी दीर्घकाळ निगडीत होता आणि प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक गुरशरण सिंग यांच्या चंदीगड स्कूल ऑफ ड्रामा चंदीगड, अक्स रंग मंच समरालामधील अनेक महत्त्वाच्या नाटकांमध्ये काम करताना त्याने दमदार परफॉर्मन्स दाखवला.

हेही वाचा :

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान धक्कादायक बातमी समोर! 

छापा टाकायचा होता, तर केपींच्या घरावर का टाकला नाही? : मंत्री हसन मुश्रीफ

 केजरीवालांना ‘सुप्रीम झटका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत मुक्काम तुरूंगातच