राष्ट्रीय खेळाडूचा जिममध्ये मृत्यू वेट उचलताना रॉडखाली मान दबली video viral

राजस्थानमधील बिकानेरमध्ये एका राष्ट्रीय खेळाडूचा जीममध्ये सराव करताना दुर्दैवी (national athlete)मृत्यू झाला. पॉवरलिफ्टिंगची प्रॅक्टिस करत असताना, यष्टिका आचार्य हिने मानेवर २७० किलो वजन उचलले होते. मात्र, अचानक पकड सुटल्याने संतुलन बिघडले आणि सर्व भार मानेवर कोसळला.या अपघातात यष्टिकाची मान मोडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बिकानेरमधील नत्थूसर गेटवर गणेश मंदिराजवळ असलेल्या ‘पॉवर हेडक्टर जीम’मध्ये ही घटना घडली.

यष्टिका राष्ट्रीय स्तरावरची पॉवरलिफ्टर होती. तिने मानेवर रॉड ठेऊन २७० किलो वजन उचलले होते. पण, संतुलन बिघडल्याने रॉड मानेवर पडला आणि तिचा मृत्यू झाला. जीममधील (national athlete)अन्य दोन खेळाडूंनी सांगितले की, यष्टिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती. प्रशिक्षक तिला वेट लिफ्ट करण्यासाठी मदत करत होते.

काही काळापूर्वी, यष्टिकाने गोव्यात आयोजित ३३ व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर क्लासिक कॅटेगरीतरौप्यपदक (national athlete)मिळवले होते. यष्टिकाचे वडील ऐश्वर्य आचार्य कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात कुटुंबियांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, त्यामुळे एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून, नंतर कुटुंबियांकडे सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा :

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या

देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान घडला धक्कादायक प्रकार!